डॉ शैलेश दोशी यांना आंतरराष्ट्रीय पुरस्कार

दिनांक २६.०१.२०११

कुर्डुवाडी येथील होमिऒपॅथिक तज्ञ डॉ शैलेश दोशी यांना होमिऒपॅथी क्षेत्रातील "इंटरनॅशनल एक्सेलंस" हा आंतरराष्ट्रीय पुरस्कार जाहीर झाला आहे. ४ फेब्रुअरी रोजी सिंगापुर येथे होणाऱ्या पॅनएशिया या ५ व्या आंतरराष्ट्रीय कॉन्फ़रन्समधे हा पुरस्कार प्रदान केला जाणार आहे. भारतातील वनौषधी विद्यापीठ व जपान व साउथ आफ्रिका येथील अल्टरनेटीव मेडिसीन च्या संयुक्त विद्यमाने सिंगापूर येथे तज्ञ डॉक्टरांची ही वैद्यकीय परिषद होणार आहे.

२००१ सालापासून गेली १० वर्षे सातत्याने डॉ शैलेश दोशी होमिऒपॅथी तज्ञ म्हणून कुर्डुवाडी, माढ़ा, पंढरपुर, अकलूज व पुणे इ. ठिकाणी कार्यरत आहेत. मुतखडा, मुळव्याध, सोरियासिस, फिस्च्युला, संधिवात, दमा, त्वचेचे विकार, लहान मुलांच्या तक्रारी, मणक्यांचे आजार, स्त्रीयांचे आजार इ. अनेक विकारांवर डॉ शैलेश दोशी व डॉ सौ सारिका दोशी यांनी होमिऒपॅथिक उपचार पद्धतीने यशस्वीरित्या उपचार करून अनेक रुग्णांना बरे केले आहे.

वैद्यकीय चिकित्सा हा केवळ व्यवसाय न मानता होमिऒपॅथी शास्त्राचा प्रचार व प्रसार यासाठी डॉ शैलेश दोशी व डॉ सौ सारिका दोशी हे सतत कार्यरत आहेत. सोलापुर जिल्ह्यातील कुर्डुवाडी, माढ़ा, पंढरपुर, अकलूज व पुणे इ. ठिकाणी होमिओक्युर क्लिनिक ह्या त्यांच्या क्लिनिकच्या शाखा असून त्याच्या माध्यमातुन होमिऒपॅथिक मार्गदर्शन व उपचार शिबीरे कार्यशाळा व्याख्याने इ. उपक्रमाद्वारे होमिऒपॅथीच्या प्रचार व प्रसाराठी झोकुन देऊन काम करत आहेत.

कुर्डुवाडीसारख्या ग्रामीण भागात प्रॅक्टिस करत त्यांनी त्यांच्या होमिओक्युर क्लिनिकच्या ४ शाखा सुरु केल्या. तसेच त्यांनी स्वताची वेबसाइट (www.homeocure.in) चालु केली असून या वेबसाइट मार्फ़त ते रुग्णांना मोफत मार्गदर्शन करत असतात. या वेबसाईटवर होमिऒपॅथी शास्त्राबद्दल सर्व माहिती, समज, गैरसमज तसेच अनेक आजारांची माहिती त्यांनी उपलब्ध केली आहे. डॉ शैलेश दोशी हे पुण्यातही कार्यरत असून केवळ भारतातीलच नव्हे तर आंतरराष्ट्रीय स्तरावरदेखिल अमेरिका, कॅनडा, ऑस्ट्रेलिया येथील रुग्णांना त्यांच्या उपचारांचा फायदा झाला आहे.

वैद्यकीय चिकित्सा हा केवळ व्यवसाय न समजुन होमिऒपॅथी शास्त्राचा प्रचार व प्रसारासाठी त्यांनी दिलेल्या बहुमोल योगदानाबद्दल तसेच विविध विकारांवरिल त्यांच्या उल्लेखनीय अशा संशोधन कार्याची दखल घेउन वनौषधि विद्यापीठाने डॉ शैलेश दोशी यांना हा पुरस्कार देऊन सन्मानित करण्याचे ठरविले आहे. अल्पवयामधे डॉ शैलेश यांनी अतिशय कष्टातून मार्ग काढित आजपर्यंत होमिऒपॅथीमधे केलेल्या कार्याचे हे एक फलित आहे. तसेच त्यांना मिळालेला हा पुरस्कार हा संपूर्ण जिल्ह्यासथी अभिमानाची गोष्ट आहे असे मत सोलापुर व पुणे जिल्ह्यातील विविध क्षेत्रातील मान्यवरांनी व्यक्त केले व डॉ शैलेश दोशी यांचे अभिनंदन केले.

मला मिळालेला पुरस्कार हा होमिऒपॅथी शास्त्राला मिळणारी मान्यता तसेच होमीओपॅथी शास्त्राचा सन्मान आहे असे मत डॉ शैलेश यांनी यावेळी दिले, तसेच यापुढे भावी आयुष्यात होमिऒपॅथीमधे अधिक कार्यरत करण्यासाथी हा पुरस्कार निश्चितच प्रेरणादायी ठरणार आहे असे डॉ शैलेश दोशी यांनी सांगीतले.