पुणे येथील नवीन शाखेचे उद्घाटन

दिनांक ०३.१०.२०११

कुर्डुवाडी येथील "होमिओक्युर क्लिनिक" च्या पुणे शाखेचा उद्घाटन सोहळा दिनांक ०२ ऑक्टोबर २०११ रोजी पार पडला. सातारा येथील सुप्रसिद्ध आयुर्वेदाचार्य व पश्चिम महाराष्ट्रातील प्रथम आयुर्वेदिक हॉस्पिटलचा मान असलेल्या आर्यलोक हॉस्पिटल चे संचालक डॉ. आनंद ओक यांच्या हस्ते उदघाटन करण्यात आले अशी माहिती डॉ. शैलेश दोशी यांनी दिली. डॉ. शैलेश दोशी व डॉ. सौ. सारिका दोशी यांनी कुर्डुवाडी येथे होमिओक्युर क्लिनिकची स्थापना केली. गेली १० वर्षे सातत्याने डॉ. दोशी हे होमिऒपॅथी तज्ञ म्हणून कुर्डुवाडी, माढा, पंढरपुर, अकलूज व पुणे येथे कार्यरत आहेत.

मुतखडा, मुळव्याध, सोरियासिस, फिश्चूला, संधिवात, दमा, त्वचेचे विकार, मणक्यांचे आजार, स्त्रियांचे आजार, लहान मुलांच्या तक्रारी इ. आजारांवर डॉ. दोशी दांपत्यानी होमिऒपॅथी उपचार पद्धतीने यशस्वीरित्या उपचार करून अनेक रुग्णांना बरे केले आहे.

कुर्डुवाडी येथून डॉ. दोशी यांनी माढा, पंढरपुर, अकलूज, करमाळा व पुणे या ठिकाणी शाखा सुरु करून त्या ठिकाणी स्वतः जाउन रुग्णसेवा केली आहे. त्यांनी सुमारे ४ वर्षांपूर्वी त्यांच्या पुणे शाखेची सुरुवात केली. पुणे शाखेच्या चौथ्या वर्धापनाचे औचित्य साधून त्यांनी त्या शाखेचे प्रशस्त अशा नवीन वास्तूमध्ये स्थलांतर केले. त्याचा उद्घाटन सोहळा डॉ. आनंद ओक यांच्या हस्ते नुकताच पार पडला.

मोठ्या शहरातून लहान गावात येणारे डॉक्टर अनेक आहेत परंतु छोट्या गावातून पुण्यासारख्या शहरात शाखा सुरु करणारे डॉ. शैलेश दोशी व डॉ. सो. सारिका दोशी यांचे कार्य खरोखरच कौतुकास्पद आहे असे डॉ. ओक यांनी याप्रसंगी म्हंटले.

ग्रामीण भागात राहून आपल्या क्लिनिकच्या माध्यमातून तसेच इंटरनेट आणि आपल्या वेबसाईटच्या माध्यमातून संपूर्ण भारतातच नव्हे तर भारताबाहेर जवळ जवळ ७ देशात रुग्णांना सेवा देणाऱ्या डॉ. दोशी दाम्पत्याचे कार्य खरोखरच वाखाणण्याजोगे आहे असे डॉ. सो. सुप्रिया ओक यांनी याप्रसंगी बोलताना सांगितले. या वेबसाईट मार्फत ते रुग्णांना मोफत मार्गदर्शन करत असतात. या वेबसाईट वर अनेक होमिऒपॅथी शास्त्राबद्दल सर्व माहिती, समज, गैरसमज तसेच अनेक आजारांची माहिती उपलब्ध केलेली आहे.

वैद्यकीय चिकित्सा हा केवळ व्यवसाय न समजून होमिऒपॅथी शास्त्राच्या प्रचार व प्रसारासाठी त्यांनी दिलेल्या बहुमोल योगदानाबद्दल तसेच विविध विकारांवरील त्यांच्या उल्लेखनीय अशा संशोधन कार्याची दखल घेऊन यावर्षी वनौषधी विद्यापीठाने डॉ. शैलेश दोशी यांना होमिऒपॅथी क्षेत्रातील "इंटरनॅशनल एक्सेलंस" हा आंतरराष्ट्रीय पुरस्कार देऊन सन्मानित केले आहे.

या प्रसंगी कुर्डूवाडी येथील श्री. दादासाहेब तरंगे, श्री. नितीन तरंगे, श्री. तात्या तरंगे, फलटण येथील श्री. सुभाष गांधी, श्री. अमित गांधी, डॉ. दोशी यांचे बंधू श्री. सचिन दोशी व सो. रुजुली दोशी, पुणे येथील डॉ. अमोल अनुगडे, डॉ. प्राजक्ता अनुगडे, डॉ. देशना भिशीकर, श्री. मंगेश दोशी, डॉ. अभिजित दोशी, श्री. सत्येंद्र कुलकर्णी, अशा अनेक मान्यवरांनी उपस्थित राहून डॉ. दोशी यांना शुभेच्छा दिल्या. डॉ. दोशी यांच्या मातोश्री श्रीमती रंजना दोशी यांनी डॉ. दोशी दाम्पत्यांना आशीर्वाद दिले व सर्वांचे आभार मानले.